👌 *बुध्दाचे सारनाथ धम्मचक्र प्रवर्तन हे भारत इतिहासातील मानवी मुल्याचे प्रतिक आहे - डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* (सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल द्वारा नागपूर मुख्यालयात आयोजित बुध्द जयंती समारोह)
भगवान बुध्दाला बुध्दगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ऋषीपतनाच्या मृगदाय अर्थात सारनाथ येथे *"प्रथम धम्मचक्र प्रवर्तन*" हे करण्याचा निर्णय बुध्दानी घेतला. सर्वप्रथम बुध्दाला आलारकालाम ह्यांची आठवण झाली. परंतु त्यांचे निर्वाण झाल्याचे कळल्यावर उद्दक रामपुत्ताची आठवण झाली. परंतु त्यांचेही निर्वाण झाल्याचे कळल्यावर त्यांना पंचवर्गीय भिक्खुची आठवण झाली. बुध्द ज्ञानप्राप्ती करीत असतांना बुध्दाची सेवाही केली होती. म्हणून पाच वर्गीय भिक्खुंना ज्ञानप्राप्तीचा उपदेश करण्याचा निर्णय बुध्दांनी घेतला होता. बुध्दाचा उपदेश पंचवर्गीय भिक्खु पैकी सर्वात आधी कौंडिण्य ह्यांना समजला. आणि मग अन्य भिक्खुंना समजला. बुध्दांनी विशद केलेल्या आठ जीवनक्रमाला *"अष्टांग मार्ग"* म्हटल्या गेले आहे. आणि बुध्दांनी सर्व प्रथम पाच भिक्खुंना जो उपदेश दिला, तो उपदेशाला "प्रथम धम्मचक्रप्रवर्तन" असे म्हणतात. बुध्दानी दोन प्रकारचे प्रवचन दिले. पहिले होते - धम्मचक्रप्रवर्तन सुत्र. त्यालाच *"चार आर्य सत्य"* असे सुध्दा म्हणतात. आणि दुसरे होते अनात्मलक्षण सुत्र. ह्यामध्ये कोणतीही गोष्ट सनातन नसल्याचे तत्व / दु:खाचे अस्तित्व मानले / अनात्म अर्थात आत्माचे अस्तित्व नाकारले आहे. बुध्दाचे उपरोक्त उपदेश आजही लागु असल्याचे मत सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* ह्यांनी अध्यक्ष पदावरून काढले.
सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल आणि अलाईड विंग तर्फे मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून *सुर्यभान शेंडे / शालिक जिल्हेकर / इंजी. शीलकुमार गोस्वामी / इंजी. विजय बागडे / रवी पाटील / दिलिप तांदळे / एड. प्रज्ञा निकोसे* हे मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन *डॉ. मनिषा घोष* ह्यांनी तर आभार प्रदर्शन *राजेंद्र घोरपडे* ह्यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *सरदार कर्नललसिंग दिगवा / डॉ. राजेश नंदेश्वर / सुरेखा खंडारे / सीमा बोरकर / दर्शना गेडाम / सपना बागडे / आशा मौंदेकर / माया घोरपडे / सुरेश खोब्रागडे / अशोक गोंडाणे / गौतम कठाणे / रविंद्र मेश्राम / शिवनाथ नागदेवे / नंदकुमार पाटील* ह्यांनी प्रयास केले. सदर कार्यक्रमात *सुर्यभान शेंडे / रवी पाटील / दिलिप तांदळे / डॉ मनिषा घोष / सुरेखा खंडारे* ह्यांनी बुद्ध गीत / भीम गीत सादर केले.